योगाचे प्रात्यक्षिक; गुणवत्तापूर्ण जीवनासाठी योगाची प्रेरणा
धाराशिव : शिंगोली येथील आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळा आणि शिंगोली आश्रम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमास योगगुरू चंद्रकांत जाधव, शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, प्रशांत राठोड, तसेच आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. योगगुरू चंद्रकांत जाधव यांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना चंद्रकांत जाधव सरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावले. “भारतीयांनी जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग आहे. निरोगी शरीरातच निरोगी मनाचा वास असतो. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी दररोज पहाटे योग करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
त्यानंतर चंद्रकांत जाधव सर व क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शवासन, ताडासन, पद्मासन, हलासन, शिर्षासन, वज्रासन, धनुरासन, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके करून दाखवली व सर्व विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंडू पडवळ, दीपक खबोले, शानिमे कैलास, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, सचिन राठोड, वरिष्ठ लिपिक संजीवकुमार मस्के, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, वैशाली शितोळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सागर सूर्यवंशी, अविनाश घोडके, सचिन अनंतकळवास, रेवा चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन योग साधनेचा अनुभव घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला.