धाराशिव (ता. २१ जून) – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने बालगृहातील सर्व बालकांनी सकाळच्या सत्रात योगाचे विविध आसने, प्राणायाम व ध्यानधारणा यामध्ये सहभाग घेतला. योगाभ्यासाद्वारे शारीरिक व मानसिक आरोग्य मजबूत होते, याचे महत्त्व उपस्थित मार्गदर्शकांनी मुलांना समजावून सांगितले.
कार्यक्रमात संस्थेच्या कर्मचारी माधुरी हरवले, शहापुरे आर. के., कदम बी. आर., शिंदे ए. एल., आशा भिसे, प्रशांत मते, अक्षय निपाणीकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मुलांना योगाबाबत मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष सहभाग देखील घेतला.
संस्थेच्या वतीने बालकांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी व योग ही जीवनशैली व्हावी, या हेतूने दरवर्षी योगदिन साजरा केला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.