शिंगोली आश्रम शाळेत राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Spread the love


धाराशिव (प्रतिनिधी) : शिंगोली येथील विद्या निकेतन माध्यमिक आश्रम शाळेत राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्ष जाधव म्हणाले की, “जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देवून मराठा साम्राज्य उभे करण्यात सिंहाचा वाटा राजमाता जिजाऊ यांनी उचलला. त्यांचे योगदान अमूल्य आहे.”

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, प्रशांत राठोड, वैशाली शितोळे, दिपक खबोले, खंडू पडवळ, सुधीर कांबळे, विशाल राठोड, सचीन राठोड, मल्लिनाथ कोणदे, शेषेराव राठोड, कैलास शानिमे, मदनकुमार आमदापुरे, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, वरिष्ठ लिपिक संजीवकुमार म्हस्के, गोविंद बनसोडे, रेवा चव्हाण, सागर सूर्यवंशी, सचिन अनंतकळवास, अमोल जगताप, वसंत भिसे यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!