
धाराशिव (प्रतिनिधी): नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या निमित्ताने शिंगोली येथील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन व शालेय साहित्याचे वाटप करून खास स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वह्या, पेन, चॉकलेट्स, पुस्तकांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. नव्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
या स्वागत कार्यक्रमात विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, प्रशांत राठोड, वैशाली शितोळे, आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांच्यासह खंडू पडवळ, चंद्रकांत जाधव, दिपक खबोले, सुधीर कांबळे, विशाल राठोड, सचीन राठोड, मल्लिनाथ कोणदे, इरफान शेख, मदनकुमार आमदापुरे, श्रीमती सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पालक, शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, रेवा चव्हाण, अमोल जगताप, सागर सुर्यवंशी, सचीन माळी यांचीही उपस्थिती लाभली.