डॉ.व्ही पी शैक्षणिक संकुलामध्ये वृक्षारोपण सप्ताह

Spread the love

   

धाराशिव – पर्यावरणाचे संतुलन हे मानवाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातुन  पर्यावरणाचे महत्व अनन्यसाधारण आहे.म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाच्या जाणीव जागृतीसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या नियोजनबद्द मार्गदर्शनाखाली डॉ.व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे  दि. 6 जून ते 26 जून या कालावधीमध्ये संकुलातील सर्व महाविद्यालयाच्यावतीने वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

        दि. 16 रोजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने संकुलातील प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून पर्यावरणाची जबाबदारी पार पाडण्यात आली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. हरी घाडगे, प्रा. डॉ. ए ए गांदले, प्रा. डॉ. आर आर इंगळे, प्रा. डी एस शेटे, प्रा. ए एस शिंदे, प्रा. पी पी माळी, प्रा. ए डी डोके, प्रा. एन एम मुंडे, बालाजी मुंढे, विलास तौर तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!