सोलापूर | वैराग – ढाळे #पिंपळगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. १५ जून रोजी धरणाचा पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचल्यामुळे हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नीलकंठा व भोगावती नदीच्या काठावर राहणाऱ्या गावकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीत उतरू नये, तसेच गुरे-ढोरे नदीत नेऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा दृष्टिकोनातून कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मा. विराज परदेशी, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, बार्शी यांनी केले आहे.
—
धरणाची स्थिती:
▪️ पाणीसाठा – १००%
▪️ सांडव्यातून विसर्ग सुरू
सावधगिरीसाठी सूचना:
▪️ नदीकाठच्या गावांनी नदीत जाऊ नये
▪️ गुरे-ढोरे पाण्यात उतरवू नयेत
▪️ संभाव्य धोका टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी
—
#धरणविसर्ग #ढाळेधरण #पिंपळगावधरण #Barshi #SolapurNews #Vairag #उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज