मुंबई | ३ जून २०२५
राज्यात पुन्हा काही ठिकाणी कोविड-१९ रुग्णांची वाढ दिसून येत असली तरी नागरिकांनी घाबरू नये, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये केवळ सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसत असून सर्वत्र तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध आहेत.
राज्यातील कोविडची सद्यस्थिती:
जानेवारी २०२५ पासून:
तपासणी केलेले रुग्ण – १२,०११
पॉझिटिव्ह रुग्ण – ८७३
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण – ३६९
एकूण मृत्यू – १० (बहुतेकांना अन्य गंभीर आजार होते)
२ जून २०२५ रोजी:
नवीन पॉझिटिव्ह रुग्ण – ५९
सक्रिय रुग्णांची संख्या – ४९४
सर्वाधिक रुग्ण – मुंबई (२०), पुणे मनपा (१७), छत्रपती संभाजीनगर मनपा (७)
लक्षणे सौम्य, पण काळजी घ्यावी:
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्या सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, धाप लागणे अशी सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग किंवा इतर सहव्याधी आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
離 चाचणी आणि उपचार:
RT-PCR चाचण्या सुरू
इन्फ्लुएंझा सारख्या आजारांवर विशेष लक्ष
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पुण्यातील NIV व BJ वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी
यंत्रणा सज्ज:
सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन बेड, ICU, व्हेंटिलेटर उपलब्ध
मनपा व जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर सातत्याने आढावा
रुग्णालयांची सज्जता तपासली जात आहे
—
✅ नागरिकांसाठी आवश्यक खबरदारी:
खोकताना/शिंकताना रूमाल किंवा मास्क वापरा
गर्दी टाळा
लक्षणे आढळल्यास सरकारी रुग्णालयात तात्काळ तपासणी करा
सहव्याधी असलेल्यांनी अधिक सतर्क राहावे
—
“घाबरू नका, पण काळजी घ्या” हा आरोग्य विभागाचा स्पष्ट संदेश आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
—
#Covid19Maharashtra #आरोग्यविभाग #कोविडअपडेट #DharashivNews #AntarsanwadNews