बकरी ईदनिमित्त ७ जूनला धाराशिव जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने राहणार बंद – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Spread the love

 ३ जून २०२५ |  धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात येत्या ७ जून २०२५ रोजी बकरी ईद (ईद-उल-अझहा) सण साजरा करण्यात येणार आहे. सण शांततेत व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ (१) नुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

हा निर्णय सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने घेण्यात आला असून, कोणत्याही प्रकारचा अनुज्ञप्तीधारक याचा भंग करणार असल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द होऊ शकते, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 त्यामुळे ७ जून रोजी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!