मदरसा दावुतुल उलूमच्या विद्यार्थ्यांचा १० वी व १२ वी परीक्षेत उत्कृष्ट निकाल – संस्थेच्या शिक्षण क्षेत्रात भरारी

Spread the love

उस्मानाबाद | प्रतिनिधी
मदरसा दावुतुल उलूम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या साराह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मोतीवाला इंग्लिश स्कूल, उस्मानाबाद व धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी माध्यमिक (१० वी) व उच्च माध्यमिक (१२ वी) विज्ञान शाखेच्या परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, प्राचार्यांचे आणि संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे परिसरात कौतुकाची लाट उसळली आहे.

मदरसा दावुतुल उलूम संस्थेचे प्रमुख रसुल शेख अलिम शेख, सचिव पेंगंबर काझी, शाळा समितीचे अध्यक्ष नबी शेख यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष आणि हायस्कूलचे सुपरवायझर बाबा फैजुद्दीन, प्राचार्य सरफराज पटेल, तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक शाहनूर पठाण व सर्व विषय शिक्षकांचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!