किणी (ता. धाराशिव) : जि. प. प्राथमिक शाळा, किणी येथील मुख्याध्यापक श्री. संजय साहेबराव कळमकर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ दि. २७ रोजी उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला. शाळेच्या वतीने त्यांना फेटा, शाल, हार, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. डॉ. गणपतराव मोरे , सय्यद असरार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे साहेब, श्अनुरथ नागटिळक, सरपंच बालाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात कळमकर सरांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात अनुरथ नागटिळक यांनी “माझा पैलवान ग फड मारून आला” अशा शब्दांत सत्कारमूर्तीचे कार्य गौरवले. सरपंच बालाजी पाटील यांनीही त्यांच्याकडून भविष्यात शाळेला मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हणमंत पडवळ सरांनी त्यांच्या बहारदार शैलीत केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनाली आरडले मॅडम यांनी केले.
या विशेष प्रसंगी सतीश शहाजी कुंभार, मुख्याध्यापक आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळा, शिंगोली, ता. धाराशिव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रतिमेचे भव्य सन्मानचिन्ह देऊन कळमकर सरांचा गौरव करण्यात आला.
हा सत्कार सोहळा शाळेच्या संपूर्ण शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एक संस्मरणीय व भावुक क्षण ठरला.