खेड (ता. धाराशिव ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक श्री. विकास पार्वतीबाई शामराव मुळे यांचा सेवा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या समारंभात मुळे सरांचा शिक्षक बांधवांनी पारंपरिक फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भरगच्च आहेर देऊन सपत्नीक सन्मानपूर्वक सत्कार केला.
गट शिक्षणाधिकारी मा. सय्यद असरार अहमद यांनी त्यांच्या प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण सेवेकडे लक्ष वेधून कौतुक केले आणि सुंदर सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. शिक्षण विस्तार अधिकारी मा. प्रकाश पारवे (येडशी बीट) यांनी मुळे सरांच्या पालकांचे विशेष उल्लेख करत त्यांच्या घडणीत घरातील योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित असलेले अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष मा. लालासाहेब मगर यांनी मुळे सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर भाष्य केले. त्यांच्या लेखनकलेचे, आर्थिक समृद्धीच्या वाटचालीचे विशेष कौतुक करत धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारचा शिक्षक विरळच असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मुळे सरांना गरजू विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही कार्य करत राहण्याचा सल्ला दिला.
या वेळी मा. बाळकृष्ण तांबारे, मा. डॉ. दयानंद जेटनुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत मुळे सरांच्या कार्याची प्रशंसा केली. ग्रामपंचायत खेडचे उपसरपंच मा. गणेश गवाड यांनी मुळे सरांच्या विनम्र व गोड शब्दांतून काम करणाऱ्या शैलीचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समारंभाचे औचित्य साधून आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश शहाजी कुंभार यांच्या हस्ते मुळे सरांना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी सतीश कानडे व हणुमंत पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा शिक्षक बंधुंच्या एकत्रित सहभागामुळे संस्मरणीय ठरला.