धाराशिव :
दिनांक – २२/०२/२०२५ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य कार्यालय नागपूर. येथे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
मा.श्री डॉ बबनराव तायवाडे साहेब यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश दत्ता बंडगर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्य आणि उद्देश आपण तळागळापर्यंत पोहोचवून संघटनेचा विस्तार करावा असे मार्गदर्शन डॉ तायवाडे यांनी करून बडगर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडी प्रसंगी मराठवाडा विभागीय अध्यक्ष म दिपकजी जाधव व नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर राऊत उपस्थित होते.