10 वी परीक्षा केंद्रात आमदारांचा ‘फोटोसेशन विक्रम’!

Spread the love


राज्यात आजपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून, सरकारने परीक्षा केंद्रांवर कडक कॉपीमुक्त अभियान राबवले आहे. परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी आहे. मात्र, हीच नियमावली सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी लागू असली तरी आमदारांसाठी नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आमदार विक्रम काळे यांचा नवा विक्रम
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आमदार विक्रम काळे यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन फोटोसेशन केले. परीक्षा सुरू असताना त्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला आणि त्यांचे चमकोगिरी करणारे फोटो सोशल मीडियावर झळकले.

“मी मोबाईल चांगल्या कामासाठी वापरला!”
या वादावर प्रतिक्रिया देताना आमदार विक्रम काळे म्हणाले, “विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी असली तरी मी तो चांगल्या कामासाठी वापरला. पालकांना त्यांच्या पाल्यांची परीक्षा कशी सुरू आहे हे माहीत व्हावे म्हणून मी फोटो काढले आणि पोस्ट केले.”

नियम सर्वांसाठी समान का नाही?
शिक्षक आमदार असलेल्या काळे यांच्या कृतीवर आता मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईलसह प्रवेश निषिद्ध असताना एका लोकप्रतिनिधीने नियम धाब्यावर बसवणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने या प्रकरणी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!