श्री संत सेवालाल महाराजांचा झेंडा व कठडा हलविण्याची कारवाई तात्काळ रद्द करावी

Spread the love

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) – तालुक्यातील आरणी येथील श्री संत सेवालाल महाराज यांचा झेंडा व कठडा काढण्याची कारवाई तात्काळ रदद करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा बंजारा समाजाच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसिलदार व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की धाराशिव तालुक्यातील आरणी येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री संत सेवालाल महाराज यांचे बांधलेला कटडा व झेंडा हलविण्यातची जिल्ह्यातील समाज बांधवांच्यावतीने दि.२३ व २४ जानेवारी २०२५ रोजी निवेदन देण्यात आलेले आहे. मागील पंधरा वर्षात पूर्वीपासून आरणी येथे समस्त बंजारा समाजातच्यावतीने श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती व उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने गावच्या हद्दीत सुंभा रस्त्याच्या कडेला कोणाशी अडथळा न येण्याच्या उद्देशाने झेंडा आणि कठडा बांधण्यात आला आहे. तसेच दरवर्षी युकोप्याने व आनंदाने जयंती साजरी केली जाते. या झेंडाव कठड्याचा कोणालाही त्रास होत नाही. मात्र काही दिवसांपूर्वी गावातील एका माय माऊलीने त्यांचा कसलाच अर्थार्थी काही संबंध नसताना गावकर्त्यांच्या आदेशानुसार श्री संत सेवालाल महाराजांचा कठडा आणि झेंडा हलविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी अर्ज देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री संत सेवालाल महाराज यांचा कचरा व झेंडा त्वरित काढण्यासाठी संबंधित तांड्यातील बंजारा समाजातील कार्यकर्त्यांना नोटीस बजावलेली आहे. नोटीस घेऊन बस जरा समाजाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराजांची जयंती असून संबंध भारतातील बंजारा समाज बांधव मोठ्या थाटाने एकोप्याने व आनंदाने उत्सव साजरा केला जातो. या चौकास गावातील व इतर समाजातील समाजकंटक जाती जातीमध्ये अंतर्गत तीळ निर्माण करणारे समाजकंटक जातीय तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने झेंडा व कठड्याचा मुद्दा समोर ठेवून शासनास वेठीस धरून हा चौक काढण्याचा अट्टहास करीत आहेत. तसेच याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही कारवाई रद्द करून ढोकी पोलीस प्रशासनास हा कठडा व झेंडा हलविण्यासाठी दिलेले आदेश वेळेत रद्द करण्याचे निर्देश द्यावेत व होणारे अंतर्गत विवाद होणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अन्यथा दि.२१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाच्यावतीने प्रशासना विरोधात आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा भारत राठोड, शरद पवार, आप्पाराव पवार, धनाजी पवार, अजय पवार, सुरेश पवार, सचिन राठोड, शहाजी चव्हाण, मोहन आडे व मोहन राठोड यांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!