धाराशिव – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुधार योजनेच्या अंतर्गत कामे केली असल्याचे दाखवून त्याचे बिल उचलले. याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे राज उर्फ हनुमंत शंकर धज यांनी केली होती. प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने वार्ड क्रमांक दहा मधील रस्ते न दाखवता वार्ड क्रमांक तीन मधील रस्ते दाखवले आहेत. त्यामुळे हे रस्ते फक्त कागदोपत्री तयार करून बिल उचलले आहे. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्याच्या अहवालातून जे काम दाखवले आहे त्या कामाची चौकशी करावी, तसेच धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांची चौकशी करावी, तेजस सुपर कन्स्ट्रक्शन वर कायम स्वरुपी बंदी आणावी , या मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दिलेल्या निवेदनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख राज धज यांनी दिला आहे.
धाराशिव जिल्हाधिकारी यांना 14 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत 25 जानेवारी 2025 रोजी झालेल्या स्थळ पाहणी अहवालामध्ये असे दिसून आले की माझी तक्रार वार्ड क्रमांक 10 मधील नॅशनल हायवे 211 ते कसबे घर ही तक्रार होती.तरी स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी यांनी वार्ड क्रमांक तीन मधील नॅशनल हायवे 211 ते मडके कॉम्प्लेक्स, ढेकळे घर ते गजेंद्र चौक, ते गोरे घर सातपुते घर या ठिकाणचा रस्ता दाखविण्यात आला.
नगरपालिका धाराशिव यांची अवस्था अशी झाली आहे की आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय. यावरून असे लक्षात येत आहे की नॅशनल हायवे 211 ते कसबे घर हा रस्ता घालायचा फक्त कागदोपत्री तयार करून बिल उचलले आहे.
नॅशनल हायवे 211 ते गोरे घर, ते सातपुते घर या रस्ताचे नकाशे मिळत नाहीत. हा रस्ता दुसरा योजनेतून झाला असेल याची शक्यता नाकारता येत नाही. नॅशनल हायवे 211 ते कसबे घर रस्ता झालाच नाही. माझी तक्रार वार्ड क्रमांक 10 मधील आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी मला वार्ड क्रमांक तीन मधील रस्ता दाखविला आहे.
चौकशी करणाऱ्या अधिकाराच्या अहवालातून असे म्हणणे आहे की रस्ता दुसऱ्या ठिकाणी केला आहे. दलित वस्तीचे काम इतर ठिकाणी करण्यात येते का ? चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालातून जे काम दाखविले आहे त्या कामाची चौकशी करावी. नॅशनल हायवे 211 ते कसबे घर हा रस्ता झालाच नाही. यामुळे नगरपालिका धाराशिव मुख्याधिकारी यांना वारंवार सांगण्यात आले होते की या कामाचे अदा करू नये तरीसुद्धा मुख्याधिकारी यांनी संगनमत करून काढले.
यामुळे नगरपालिका धाराशिव मुख्याधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. तसेच तेजस सुपर कन्स्ट्रक्शन या कंपनीवर कायम स्वरुपी बंदी आणावी. या भ्रष्टाचाराचा छडा लावून योग्य ती कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालयावर मोर्चा काढण्यात असा इशारा देखील दिला.
यावेळी निवेदन देताना आरपीआय (डे) चे जिल्हा संपर्कप्रमुख राज धज ,किशोर माने, कौतुक माने ,अजय माने, रोहित राठोड, प्रतीक साळवी उपस्थित होते.