बळजबरीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या महावितरणच्या निर्णयाला नागरिकांचा तीव्र विरोध

Spread the love

धाराशिव: महावितरण कंपनीने ग्राहकांचा कोणताही विचार न करता जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून,अनेक ठिकाणी विरोध  होत असताना सुध्दा धाराशिव जिल्हात व शहरात मिटर बसवण्यात येत आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय हा निर्णय लादण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

महावितरणच्या या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्यासाठी सुध्दा तयार आहेत. तर ज्या ठिकाणी हे मिटर बसवण्याचे चालू आहे अशा अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे, तर हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धाराशिवच्या नागरिकांकडून देण्यात येणार आहे असे चर्चा होत आहे.

या सर्व प्रकरणावर ग्राहकांचे म्हणणे आहे की, “महावितरणने आधीच वारंवार दरवाढ करून ग्राहकांवर भार टाकला आहे. त्यातच आता स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून लोकांच्या खिशाला अधिक कात्री लावली जात आहे. या मीटरमुळे वीजबिल आधी भरणे बंधनकारक होणार असून, ते भरण्यास विलंब झाला तर वीजपुरवठा त्वरित खंडित केला जाणार आहे.

मीटर चे पैसे देखील कोण भरणार असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत. पुन्हा हेच नागरिकांच्या वीज बिलामध्ये ऍड होऊन येईल तर पुन्हा काय करावे असा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता मीटर बदलण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया  नागरिकांनी दिली आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे काय?

स्मार्ट प्रीपेड मीटर हे असे उपकरण आहे, जे ग्राहकांनी आगाऊ पैसे भरल्यानंतरच वीज वापरण्यास अनुमती देते. मोबाइल रिचार्जप्रमाणे हे मीटर आधी भरणे आवश्यक असते. जर ग्राहकांनी वेळेत पैसे भरले नाहीत, तर वीजपुरवठा आपोआप बंद होतो.

ग्राहकांचे म्हणणे आहे की, “सध्याच्या परिस्थितीत वीजबिल भरण्यास विलंब झाला, तरी काही दिवसांचा वेळ मिळतो. परंतु, स्मार्ट मीटरमुळे लगेचच वीजपुरवठा खंडित केला जाईल, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांचे मोठे नुकसान होईल.”

पण हा मिटर बसवण्यासाठी नागरिकांचा आक्षेप आहे की, “जर स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी फायद्याचे असतील, तर ते लादण्याऐवजी पर्यायी पर्याय द्यावा. ग्राहकांना निवड करण्याचा अधिकार असावा.”

सरकार आणि महावितरणला नागरिकांची मागणी आहे की हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.

स्थानिक नागरिकांकडून सरकारकडे आणि महावितरणकडे ही सक्ती त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. “जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटरबाबतचा हा वाद पुढे काय वळण घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सरकार आणि महावितरणने लोकांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय पुनर्विचारात घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!