धाराशिव: शहरातील अग्रनामांकित चिंतामणी को- आॅप क्रेडीट सोसायटीच्या नववर्ष २०२४ दिनदर्शिकेचे जिल्हा सहकार अधिकारी तथा सहकार प्रशिक्षण अधिकारी मधुकर जाधव व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़
धाराशिव येथे सोसायटीच्या कार्यालयात शनिवारी (दि़३०) हा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी चिंतामणी सोसायटीचे चेअरमन विनोद निंबाळकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित, सचिव रविशंकर पिसे, संचालक सुहास तेरकर, अमोल नाईकनवरे, किशोर पवार, गोपीनाथ पवार, विजय मुगळे, संदीप इंगळे, जमशेद पठाण, अनुज कुदळे, रमजान तांबोळी, पाशा शेख, अमीर तांबोळी, वैभव गव्हाणे आदी उपस्थित होते़