धाराशिव दि.२३ (माध्यम कक्ष) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले.या निवडणुकीत ४ लक्ष ८९ हजार १२२ पुरुष आणि ४ लक्ष ३२ हजार १४० महिलांनी तर १८ तृतीय पंथीयांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
आज २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे प्रवीण विरभद्रया स्वामी, तुळजापूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे कैलास बाळासाहेब घाडगे पाटील आणि परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट)प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी विजय मिळविला.
आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.उमरगा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उमरगा पंचायत समिती सभागृह येथे,तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी स्पोर्ट हॉल, श्री.तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज तुळजापूर येथे,उस्मानाबाद मतदारसंघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे आणि परांडा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय निवासी शाळा गोळेगाव भूम येथे करण्यात आली.
उमरगा मतदारसंघाची मतमोजणी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबलवर २३ फेऱ्यात करण्यात आली.तुळजापूर मतदारसंघाची मोजणी १४ ईव्हीएम मतमोजणी टेबलवर ३० फेऱ्यात,उस्मानाबाद मतदारसंघाची
मतमोजणी १४ ईव्हीएम टेबलवर ३० फेऱ्यांमध्ये आणि परांडा मतदारसंघाची मतमोजणी १४ ईव्हीएम टेबलवर २७ फेऱ्यांमध्ये करण्यात आली.
उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) ज्ञानराज चौगुले – ९२ हजार २४१,(उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे) प्रवीण स्वामी -९६ हजार २०६,बहुजन समाज पार्टीच्या सुनंदा रसाळ -११७६,वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड -४०८७ ,मराठवाडा मुक्ती मोर्चाचे शिवप्रसाद काजळे -२६५,प्रहार जनशक्ती पार्टीचे सातलिंग स्वामी -४०८, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( ए) चे संदीप कटबु -३६३,अजयकुमार देडे (अपक्ष) -५३९,उमाजी गायकवाड (अपक्ष) -३१३आणि श्रीरंग सरवदे (अपक्ष) – ८४५ मते मिळाली.तर नोटाला १३३० मते मिळाली.या मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) प्रवीण स्वामी विजयी झाले.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कुलदीप धीरज कदम पाटील – ९४ हजार ९८४ ,भारतीय जनता पार्टीचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील – १ लक्ष ३० हजार ८६३, प्रहार जनशक्ती पार्टीचे अण्णासाहेब दराडे -१४३८,ऑल इंडिया मजलिस -ए -इन्कलाब- ए- मिल्लतचे शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी – २४९,राष्ट्रीय समाज पक्षाचे धनंजय तर्कसे पाटील -२४१, आदर्श संग्राम पार्टीचे धीरज पाटील – १८७,आझाद समाज पार्टी (कांशी राम ) भैय्यासाहेब नागटिळे – ७९२,समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी – १६ हजार ३३५, संभाजी ब्रिगेड पार्टीचे शरद पवार – २३८, जनहित लोकशाही पार्टीचे सचिन शेंडगे – १७०,वंचित बहुजन आघाडीच्या डॉ.स्नेहा सोनकाटे – ७९०८,अमीर शेख (अपक्ष) – २५३,अमेर शेख (अपक्ष) – १६५,उज्वला गाटे (अपक्ष ) -३०७,काकासाहेब राठोड (अपक्ष)-४१८,योगेश केदार (अपक्ष) -५४९,तात्या रोडे (अपक्ष) – ६००, दत्तात्रय कदम (अपक्ष) – ७४४,धनाजी हुंबे (अपक्ष) -१५३,ऍड.पूजा देडे (अपक्ष) – ३७९,मन्सूर शेख (अपक्ष) -११४,गणेश रोचकरी (अपक्ष) – १५५,आणि सत्यवान सुरवसे (अपक्ष) -४६८ मते मिळाली. नोटाला ७६९ मते मिळाली.या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे राणाजगजितसिंह पाटील विजयी झाले.नोटाला ७६९ मते मिळाली.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) चे अजित पिंगळे यांना ९४ हजार ७,(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कैलास घाडगे पाटील – १ लाख ३० हजार ५७३,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवदत्त मोरे – २ हजार ४२, बहुजन समाज पार्टीचे लहू खुने – ५९५,वंचित बहुजन आघाडीचे प्रणित डिकले – १० हजार ११७, भारतीय जनविकास पार्टीचे डॉ.रमेश बनसोडे – २८३,राष्ट्रीय समाज पक्षाचे श्रीहरी माळी – १४४०, टिपू सुलतान पार्टीचे सिराज सय्यद – ५११,अशोक कसबे (अपक्ष) – ४२६,दत्ता तुपे (अपक्ष) – २४०, नितीन काळे (अपक्ष) – ६०३ आणि विक्रम काळे (अपक्ष) – ५७७ मते मिळाली.१५८१ मते नोटाला मिळाली.यामध्ये शिवसेना (उबाठा) कैलास पाटील घाडगे विजयी झाले.
परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रा.डॉ.तानाजी सावंत – १ लक्ष ३ हजार ३५४ , बहुजन समाज पार्टीचे महादेव लोखंडे – ८५६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे राजेंद्र गपाट – ८५३, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे – १ लक्ष १ हजार ७४५, राष्ट्रीय समाज दल(आर) चे आर्यनराजे शिंदे – ६०२,वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल – १२ हजार ६९८,राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.राहुल घुले – २१७० , समाजवादी पार्टीचे ॲड.रेवण भोसले -१६७, बहुजन महापार्टीचे शाहाजहान शेख – ११७ ,अरुण जाधवर (अपक्ष) -३५१,असिफ जमादार (अपक्ष) -३२३, गुरुदास कांबळे (अपक्ष) -४७२,जमिलखा पठाण (अपक्ष) -४४४६,दिनेश मांगले (अपक्ष) -२३६,विनयराज देशमुख (अपक्ष) -१३२,श्रीमती नुरजहा शेख (अपक्ष) -६९४, बंडू पोळ (अपक्ष) -७८७ ,राहुल मोटे (अपक्ष) – ७९०, लक्ष्मीकांत आटूळे (अपक्ष ) -१२५४, सोमनाथ कदम (अपक्ष) -८५८ व संभाजी शिंदे (अपक्ष,) यांना १३२ मते मिळाली. ६८८ मते नोटाला मिळाली.या मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे विजयी झाले.