४ लक्ष ८९ हजार पुरुष व ४ लक्ष ३२ हजार महिलांनी बजावला मतदानाचा हक्क.
१८ तृतीय पंथीयांनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य.
धाराशिव दि.२१ ( प्रतिनिधी ) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करीता जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ६५.५८ इतकी आहे.सर्वाधिक मतदान ६९.८३ टक्के परंडा विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ६१.७९ टक्के मतदान उमरगा विधानसभा मतदारसंघात झाले.तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ६६.९८ टक्के व उस्मानाबाद मतदारसंघाची टक्केवारी ६३.७३ टक्के आहे.या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील ४ लक्ष ८९ हजार १२२ पुरुष आणि ४ लक्ष ३२ हजार १४० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.तर १८ तृतीय पंथीयांनी देखील मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
२४० – उमरगा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ६६ हजार ३० पुरुष,१ लक्ष ४९ हजार ३५५ महिला आणि ९ तृतीय पंथीय असे एकूण ३ लक्ष १५ हजार ३९४ मतदार आहे.२० नोव्हेंबर रोजी १ लक्ष १ हजार ७८७ पुरुष,९३ हजार १०३ महिला आणि ६ तृतीयपंथी अशा एकूण १ लक्ष ९४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
२४१ – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लक्ष ८३ हजार ७७ मतदार आहे.यामध्ये २ लक्ष १ हजार २५ पुरुष,१ लक्ष ८२ हजार ४५ महिला आणि ७ तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. यापैकी २० नोव्हेंबर रोजी २ लक्ष ५६ हजार ५६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये १ लक्ष ३५ हजार ९९१ पुरुष,१ लक्ष २० हजार ५७६ महिला आणि २ तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
२४२ – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ९६ हजार ३५२ पुरुष,१ लक्ष ७८ हजार ३९९ महिला आणि १७ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ७४ हजार ७६८ मतदार आहे.त्यापैकी २ लक्ष ३८ हजार ८४०मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये १ लक्ष २७ हजार १२७ पुरुष,१ लक्ष ११ हजार ७०८ महिला आणि ५ तृतीयपंथी मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केले.
२४३ – परंडा विधानसभा मतदारसंघात ३ लक्ष ३० हजार ७७३ मतदार असून यामध्ये १ लक्ष ७५ हजार २२१ पुरुष,१ लक्ष ५५ हजार ५४६ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार आहे.त्यापैकी १ लक्ष २४ हजार २१७ पुरुष,१ लक्ष ६ हजार ७५३ महिला आणि ५ तृतीयपंथी मतदार अशा एकूण २ लक्ष ३० हजार ९७५ मतदारांनी मतदान केले.