धाराशिव : लोकसभेचे संसदेमध्ये दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी भारताचे संविधान वाचून याकरिता महाविकास आघाडीला मतदान करावे असे आव्हान आज पत्रकारांशी संवाद साधत असताना पवनराजे कॉम्प्लेक्स येथे केले.
आपकी बार 400 चा नारा भाजपाने केवळ संविधान बदलण्याच्या उद्देशाने दिलेला आहे. भाजप छुप्या पद्धतीने पक्षीय हुकुमशाही आणणार असून त्यांना 400 पेक्षा जास्त बहुमत याच कारणासाठी हवे आहे. येथून पुढे भविष्या भारतातील लोकशाही धोक्यात असून तिला वाचवणे हे सर्वसामान्य मतदारांच्या हातात असून सर्वसामान्य मतदारांनी जागृत होऊन लोकशाही संवर्धनाकरिता महाविकास आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
याचबरोबर आपण पक्षातील हुकुमशाही व हुकुमशाहीच्या वळणारी जाणारी पक्षाची ध्येय धोरणे यास कंटाळून आपण भाजप पक्ष सोडला असल्याचे नमुद केले आहे.
यावेळी शिवाजी सरडे उपतालुकाप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ,रवी कोरे आळणीकर, अँड संजय भोरे उपस्थीत होते.