धाराशिव येथे समता सैनिक दल स्थापना दिवस या औचित्याने समता सैनिक दलाच्या धाराशिव तालुक्यात दलाची बांधणी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष स्वराज जानराव व समता सैनिक दलाचे सचिव सचिन दिलपाक यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .
सुरवातीला सैनिकांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना – सलामी देण्यात आली .त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली . या बैठिकेदरम्यान नवीन नोंदणी झालेल्या सर्व सैनिकांचे स्वागत करण्यात आले . बैठीकीदरम्यान सर्व सैनिकांनी आपली मते मांडली व नवीन जास्तीत जास्त सैनिक तयार करण्याचा ठराव या समता सैनिक दलाच्या स्थापना दलाच्या स्थापनेच्या दिनी घेण्यात आला .
यावेळी या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट सोसायटीचे धनंजय वाघमारे , दिपक डावरे सर , पृथ्वीराज चिलवंत, संतोष बनसोडे , नितीन लांडगे , अमरदीप धावारे, सम्यक चिलवंत , तेजस गायकवाड , आशिष कांबळे , अमोल लांडगे ,लक्ष्मण सोनावणे , आदी सैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .