धाराशिव : पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन दि.11.03.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक हे गस्तीस असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि धारशिव शहरातील बालाजीनगर येथे एक महिला काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता बालाजीनगर मधील उत्तर मुखी घरामध्ये तीन महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी नामे- एक वय 40 वर्षे महिला, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होती व नमुद आरोपी ही त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने आरोपी नामे- भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील एक मोबाईल फोन, निरोधची पाकीटे व रोख रक्कम असा एकुण 17,508 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपीच्या ताब्यातुन त्या महिलांची सुटका करुन आरोपी नामे- भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव यांचेविरुध्द गुरनं 105/2024 भा.दं.वि. सं. कलम- 370, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5, 7 अन्वये धारशिव शहर पोलीस ठाण्यात दि. 11.03.2024 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सपोनि श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, मपोहेकॉ शोभा बांगर, चालक पोहेकॉ लाटे यांच्या पथकाने केली.