धाराशिव दि.8 ) धाराशिव येथील बसस्थानकाची जुनी इमारत पडून त्या जागेवर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.दररोज हजारो प्रवासी व विद्यार्थी येथून बाहेरगावाहून ये-जा करतात.इमारत पाडल्यामुळे प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज 8 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा संपल्यानंतर बसस्थानक गाठून तेथील कामाची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.
बसस्थानकाची नवीन इमारत बांधण्यापूर्वी या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांना केल्या.येणाऱ्या प्रवाशांच्या बसण्याची आणि बसण्याच्या ठिकाणी फरशी,पिण्याचे स्वच्छ पाणी व स्वच्छतागृह याची सुविधा 26 जानेवारीपर्यंत उपलब्ध करावी.बसेस बसस्थानकात प्रवेश करतेवेळी आणि जातांना धूळ उडून प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही यासाठी नियमितपणे पाणी मारण्यात यावे.असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी एस.टीच्या अधिकाऱ्यांना दिले.