धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण झाले आहे अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे व त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिक माहिती खालील प्रमाणे.
लैंगीक अत्याचार.”
येरमाळा पोलीस ठाणे :एका गावातील 14 वर्षे 5 महिने महिला (नाव- गावगोपनीय) दि.07.04.2026 रोजी 17.00 वा. सु. हि एकटी असल्याचा फायदा घेवून एका गावातील एका तरुणानी तिस गावातील रोडला जाणाऱ्या रस्त्याचे एका पायवाटाने डोंगराजवळ नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतीची आईने दि.06.05.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1) (2) (फ) (जे) सह कलम 4, 8 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :एका गावातील 17 वर्षे 10 महिने मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.22.05.2025 ते 01.05.2026 रोजी 14.00 वा. सु. 5 आरोपींनी संगणमत करुन नमुद पिडीत मुलीचे लग्न लावून देवून नमुद एका तरुणानी तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.06.05.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2)(एम), 3(5) सह 4 पोस्को ॲक्ट सह 9,11 बालविवाह कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अपहरण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रंगनाथ भिवाजी कोकरे, वय 36 वर्षे, रा. काळमवाडी पोस्ट पिलीव ता. माळशिरस जि. सोलापूर ह.मु. सुशांत देशमुख यांचे शेतात शिराढोण यांचा मुलगा नामे- संतोष रंगनाथ कोकरे, वय 15 वर्षे, रा. रा. काळमवाडी पोस्ट पिलीव ता. माळशिरस जि. सोलापूर ह.मु. शिराढोण येथील सुशांत देशमुख यांचे शेतात शिराढोण यास दि.03.05.2026 रोजी 05.00 वा. सु. सुशांत देशमुख यांचे शेतात शिराढोण येथुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रंगनाथ कोकरे यांनी दि.06.05.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 137 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.