धाराशिव :
सिना कोळेगाव धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12.10 वाजता धरणातून सुरू असलेला 80,150 क्युसेक विसर्ग कमी करून 74,800 क्युसेक करण्यात आला आहे.
तथापि, पावसाचे प्रमाण व धरणात होणारी पाण्याची आवक यावर विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिना नदीच्या दोन्ही तिरावर राहणाऱ्या शेतकरी व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, सिना कोळेगाव प्रकल्प विभाग, परंडा यांनी केले आहे.