धाराशिव ते बेंबळी रस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात – तीन जण जखमी
धाराशिव (प्रतिनिधी) :
धाराशिव ते बेंबळी रोडवर रुईभर गावाजवळ आज दुपारी साधारणपणे 3.15 वाजता दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हे वृत्त अपडेट करण्यात येईल.