नळदुर्ग (, जि. धाराशिव) :
सोलापूर–उमरगा राष्ट्रीय महामार्ग (NH-65) वरील नळदुर्ग घाटाजवळ साईप्रसाद हॉटेल समोर गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास कार व ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन इसम ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा तपशील :
प्राथमिक माहितीनुसार, कार (क्रमांक KA-41B-2600) चालकाला झोपेची ढोलकी लागल्याने वाहन रॉंग साईडला गेले व समोरून येणाऱ्या ट्रकला (क्रमांक TS-31UB-8676) समोरासमोर धडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेत कारमधील दोन इसमांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र ते आळंद परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींना १०८ ॲम्बुलन्सद्वारे तातडीने नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई :
अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत, हवालदार प्रल्हाद वाघचौरे, सतीश पवार, पोलिस नाईक सचिन खंडेराव, पोलिस कॉन्स्टेबल राजू चव्हाण तसेच इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.