कळंब ( खादिम सय्यद ) – खामगाव-पंढरपुर मार्ग कळंब शहरातून जात असल्याने येथे सतत रहदारीचा ताण वाढत असून, गेल्या दोन महिन्यांत 10 ते 15 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये दहा दिवसांपूर्वी कै. विलास गंदुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर आज (दि.25 ऑगस्ट) दुपारी 3.25 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालयासमोर गंभीर अपघात झाल्याची माहिती आहे.
कळंब शहरातील न्यायालय, तहसील, पोलीस स्टेशन, एमएससीबी, 132 केव्ही ऑफिस, ढेंगळे हॉस्पिटल, शासकीय धान्य गोदाम, तालुका क्रीडा संकुल व होळकर चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. त्याचबरोबर या रस्त्यावर चार शाळा व दोन महाविद्यालय असल्याने विद्यार्थी दैनंदिन या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांना अर्ज देण्यात आला असून, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, कळंब तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांना तातडीने आदेश देऊन कळंब शहरातील धोकादायक ठिकाणी गतीरोधक व सूचना फलक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर गणेश करंजकर, शुभम करंजकर, सुदर्शन कोळपे, राम शिंदे, अनिल भिंगारे, आदिश कोरे, आकाश जाधव, महेश कोळपे, नंदकुमार अडसूळ, विशाल दुगाने, ओंकार तोडकर, प्रमोद गोरे, अभिजित करंजकर, राहुल करंजकर, स्वराज करंजकर, कुणाल करंजकर, यश भिसे, रणधीर देशमुख, गोरक्ष करंजकर, हेमंत कोळपे, संजय जाधव, विकास चोंदे, आकाश चोंदे, आदित्य शिंदे, अशोक (चाचा) चोंदे, वैभव माकुडे यांसह मोठ्या संख्येने कळंब शहरातील नागरिक उपस्थित होते. हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.प्रसार माध्यमाशी बोलताना आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.