शिवसेनेकडून पुन्हा भाजप–काँग्रेसला खिंडार; तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर प्रवेश

Spread the love

तुळजापूर – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धती व विचारांनी प्रेरित होऊन तुळजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप आणि काँग्रेसला धक्का देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलाच रंग चढला आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, संपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे व तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांना भगवा झेंडा देऊन शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.

✍️ प्रवेश घेणारे सदस्य :

नळदुर्ग – शारदाताई घोडके, ज्योतीताई पवार

चिकुंद्रा – दिपक शिवाजी मोटे, सुधाकर यशवंत गायकवाड, केशव बलभीम बागल, नितीन राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत महेश गायकवाड

वाणेगाव – सुरेश बचाटे, बसवंत देवकते

काटगाव – सूर्यकांत जोकार

यापूर्वीही तालुक्यातील भाजप व काँग्रेसमधील अनेक ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत दाखल झाले होते. आता पुन्हा झालेल्या या प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले – “ही फक्त सुरुवात आहे. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच तुळजापूर शहरातील माजी नगरसेवक यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य जाहीर प्रवेश होणार आहे.”

या कार्यक्रमास मीनाताई सोमाजी, राधा घोगरे, रेणूका शिंदे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते, तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, युवा नेते शहाजी हाक्के, भुजंग मुकेरकर, रितेश जावळेकर, नितीन मस्के, स्वप्निल सुरवसे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

आगामी काळात तालुक्यातील इतर नेते आणि सदस्य देखील शिवसेनेत दाखल होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!