Tuljapur : १५ ऑगस्ट २०२५
पुरातत्व विभागाच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहगाभाऱ्यात जीर्णोद्धाराचे काम दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू आहे. हे काम मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाच्या दृष्टीने आवश्यक असून, ते पूर्णपणे भाविकांच्या सुरक्षेच्या तसेच मंदिराच्या जतनासाठी केले जात आहे.
या कालावधीत सिंहगाभाऱ्यात प्रवेश बंद राहणार असल्यामुळे ‘धर्मदर्शन’ व ‘देणगी दर्शन’ बंद राहणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांना नम्र विनंती करण्यात येते की त्यांनी दर्शनासाठी येताना याची नोंद घ्यावी.
तथापि, मुखदर्शनाची व्यवस्था नियमितपणे सुरू राहणार आहे, त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध राहील.
विशेष सूचना:
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग सुट्ट्यांमुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाविकांनी गर्दी व गैरसोयी टाळण्यासाठी वरील कालावधीत दर्शनाच्या नियोजनात योग्य तो विचार करावा.
या दरम्यान सिंहासन पूजा, अभिषेक पूजा तसेच इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील.
श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी सदर सूचना लक्षात घेऊन योग्य नियोजन करून मंदिरात यावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्याकडून करण्यात येत आहे.
- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर