Tuljapur:
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे विधीवत दर्शन घेतले. देवीची पूजा, अर्चा व आरती करून त्यांनी कुलधर्म कुलाचार पार पाडले.
याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते. त्यांनीही जलसंपदा मंत्र्यांसह देवीचे दर्शन घेऊन मातेचा आशीर्वाद घेतला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.