धाराशिव | प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांच्या वतीने पाटस – दौंड – बार्शी – उस्मानाबाद – बोरफळ रस्ता (रामा-६८) या मार्गावर, धाराशिव शहरातील जिजामाता चौक ते सांजा चौकलांबी या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम दि. १२ ऑगस्ट २०२५ ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणार असून, संबंधितांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.