धाराशिव,दि.११ जुलै ) तुळजापूर तालुक्यातील माजी सैनिकांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या उपक्रमांतर्गत एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कायदेशीर कल्याणासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजनांवर काम करत असून,या अंतर्गत Para Legal Volunteers (पारा लीगल स्वयंसेवक) म्हणून काम करण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
या स्वयंसेवी सेवेद्वारे माजी सैनिक विविध कायदेशीर सेवा देण्यास हातभार लावतील.इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव,पत्ता व संपर्क क्रमांकासह तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ०२४७२-२२२५५७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ७५८८५२७५५४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. माजी सैनिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन सामाजिक सेवा कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#माजीसैनिक
#पॅरालीगलस्वयंसेवक
#धाराशिवन्यूज
#उस्मानाबादन्यूज
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज