धाराशिव (११ जुलै) : उपळा केंन्द्राचे केंद्रप्रमुख सौ. सुकेशनी वाघमारे मॅडम यांनी आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळा व विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेला शालेय तपासणी दौरा संपन्न.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची हजेरी, शालेय पोषण आहाराची अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची सविस्तर पडताळणी केली. सर्व निरीक्षणांनंतर उपस्थित शिक्षकांना त्यांनी सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदरार्थ मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी केंद्रप्रमुख मॅडम यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
या कार्यक्रमाला रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, दीपक खबोले, खंडू पडवळ, प्रशांत राठोड, सुधीर कांबळे, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, सचिन राठोड, श्रीमती सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, वैशाली शितोळे मॅडम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, वसंत भिसे, लिंगा आडे, अविनाश घोडके, सचिन अनंतकळवास, अमोल जगताप, रेवा चव्हाण यांची उपस्थिती लाभली.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी या भेटीचे स्वागत करत कार्यक्रम यशस्वी केला.