YouTube चे नवीन धोरण: 15 जुलैपासून कॉपी-पेस्ट कंटेंटवर बंदी, उत्पन्न थांबण्याची शक्यता ,Monetization Policy change

Spread the love

धाराशिव | १० जुलै २०२५ – यूट्यूबने आपल्या कमाई धोरणात (Monetization Policy) मोठा बदल जाहीर केला असून, हे नवीन नियम १५ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. यामध्ये AI आधारित, कॉपी-पेस्ट स्वरूपातील, किंवा पुन्हा-पुन्हा तेच कंटेंट अपलोड करणाऱ्या चॅनेल्सवर कारवाई केली जाणार आहे.

नवीन धोरणानुसार, अशा प्रकारचा कंटेंट जो “repetitive”, “mass-produced” किंवा “कमीतकमी मानवी हस्तक्षेपाने तयार झालेला” आहे, त्याला यापुढे उत्पन्न मिळणार नाही. या निर्णयामुळे लाखो यूट्यूब क्रिएटर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यूट्यूबचे म्हणणे आहे की, “व्ह्यूअर्सना उपयुक्त, मौलिक व वैयक्तिक सृजनशीलता असलेला कंटेंट देणं हेच आमचं ध्येय आहे.” त्यामुळे आता AI किंवा टेम्प्लेटवर तयार होणाऱ्या स्लाइडशो, व्हॉईसओव्हर, मोटिवेशनल व्हिडिओ इत्यादींसाठी मॉनेटायझेशन थांबू शकते.

⚠️ याचा परिणाम कोणावर?

फक्त “कॉपी केलेले”, “एकसारखे शॉर्ट्स”, किंवा “AI generated slideshows” असणारे यूट्यूब चॅनेल्स थेट प्रभावाच्या झोनमध्ये येतील.

शैक्षणिक, माहितीपूर्ण व वैयक्तिक स्पर्श असलेले व्हिडिओ मात्र सुरक्षित राहतील.

✅ उपाय:

1. व्हिडिओला मूळ कॉमेंटरी व दृष्टिकोन द्या.

2. कंटेंटमध्ये मानवी सहभाग आणि सर्जनशीलता ठेवा.

3. कोणतीही माहिती AI किंवा दुसऱ्या स्त्रोताकडून घेतली असल्यास, त्यात वैयक्तिक विचार किंवा विश्लेषण जोडा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!