धाराशिवमध्ये शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली; पक्षवाढीवर सखोल चर्चा

Spread the love

धाराशिव, दि. 10 जुलै : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार धाराशिव येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

शासकीय विश्रामगृह एस.पी. ऑफिसजवळ पार पडलेल्या या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षवाढीबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीचे आयोजन शिवसेना शहरप्रमुख आकाश कोकाटे यांनी केले होते.

बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी मार्गदर्शन करत जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुतीवर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे डी.एन. कोळी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनु जाती-जमाती विभाग), आकाश कोकाटे (शहरप्रमुख), व अन्य नेत्यांनी पक्ष विस्ताराबाबत आपले विचार मांडले.

महिला आघाडीच्या जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर, महिला तालुकाप्रमुख माया चव्हाण, महिला शहरप्रमुख कल्पनाताई माळी, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, शिवउद्योग सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शेरखाने, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शामशोद्दीन शेख, VJNT जिल्हाध्यक्ष कमलाकर दाणे, ओबीसी शहराध्यक्ष यश हंचाटे, युवासेना जिल्हा संघटक आकाश कावळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत येणाऱ्या काळातील संघटनात्मक भूमिका, मतदारसंघातील लोकांशी संवाद, शिवसेनेच्या धोरणांची माहिती पोहोचवणे व निवडणुकांची पूर्वतयारी यावर भर देण्यात आला.

या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून शिवसेना पक्षाला धाराशिव जिल्ह्यात अधिक बळकट करण्याचा निर्धार केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!