गाडीच्या ड्रायव्हरचा चोर ! ,धाराशिव पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल जप्त केला; 8 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोनं, चांदी आणि रोख रक्कम ताब्यात

Spread the love

धाराशिव

दिनांक 29 मे 2025 रोजी, भुम शहरातील हॉटेल शिवनेरी समोरून फिर्यादी अनिल पांडुरंग बेदरे (राह. जामखेड) यांच्या गाडीतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण 9,62,110 रुपयांचे मुद्देमाल चोरीला गेला होता. या बाबत भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी अनिल बेदरे यांनी ताब्यात असलेल्या गाडीच्या ड्रायव्हरवर संशय व्यक्त केला. यावरून, भूम पोलीस ठाणे आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती गोळा करून, आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीदरम्यान त्याच्या साथीदाराचे नावही सांगितले.

आरोपी चंद्रकांत चव्हाण (राह. सावरगाव, ता. जामखेड) यास सावरगाव येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून चोरीस गेलेले 65 ग्रॅम सोनं, 75 ग्रॅम चांदी आणि 1,50,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 8,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी आणि अन्य पोलिसांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरोदे करत आहेत.

#उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!