धाराशिव, ता.१० : इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, धाराशिव येथे नुकतेच सहाय्यक संचालक पदावर नियुक्त झालेले श्री. अमोलजी ताकभाते यांचे विविध आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधींच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या स्वागतप्रसंगी माध्यमिक आश्रमशाळा माने सर, प्राथमिक आश्रमशाळा शिंगोलीचे मुख्याध्यापक सतीश कुंभार सर, तसेच नळदुर्ग आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वैभव जाधव सर प्रमुख उपस्थित होते.
विद्यानिकेतन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, वरिष्ठ लिपिक संजीवकुमार मस्के, उमरेगव्हाण आश्रम शाळेचे प्रतिनिधी जयसिंग जाधव व तानुरकर सर यांनी देखील आपल्या उपस्थितीने स्वागत सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले.
श्री. ताकभाते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून, इतर मागास समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
—
#धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज