शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम जोमात – तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

तुळजापूर (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानाला तालुक्यातील विविध गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा नुकताच संपन्न झाला असून, सिंदफळ, सांगवी मार्डी, सारोळा सांगवी, काटी, पांगदरवाडी आदी गावांमध्ये जाऊन शिवसेनेच्या विचारांची मांडणी करण्यात आली व गावागावातील असंख्य नागरिकांनी पक्षात प्रवेश करत सदस्यत्व स्वीकारले.

विशेषतः या सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये 18 पगड जाती-जमातींसह अल्पसंख्यांक समुदायातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळे पक्षाच्या सामाजिक विस्ताराला चालना मिळाल्याचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी नमूद केले.

या कार्यक्रमा मध्ये शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख पनुरे यांच्या नावाचा उल्लेख करताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना “शेतकऱ्यांचे खरे कैवारी आणि नेते” अशी त्यांची स्तुती करत आनंदोत्सव साजरा केला.

तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “ही मोहीम संपूर्ण तालुक्यात राबवण्यात येणार असून, उद्याही अनेक गावांमध्ये जाऊन सदस्य नोंदणी केली जाणार आहे. या महिन्यात पाच हजार सदस्य नोंदणीचा टप्पा पार करण्याचे आमचे ध्येय आहे.”

या सदस्य नोंदणी मोहिमेत शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेते, शहर उपप्रमुख रमेश काका चिवचुवे, संजय लोंढे, भुजंग मुखेडकर, संजय पेंदे, चिमूभाई शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले होते. गावागावातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

या अभियानाच्या माध्यमातून शिवसेना तालुक्यात नवचैतन्य निर्माण करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पक्षाविषयी नव्याने विश्वास निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!