मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखाना कार्यस्थळावर वृक्ष लागवड
जागतीक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम

Spread the love


धाराशिव : प्रतिनिधी
   सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. गुरुवारी (दि.५) जागतीक पर्यावरण दिनाचे औचीत्य साधून मांजरा शुगर इंड्रस्टीज कारखान्यावर अधिकारी, कर्मचारी यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
   यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. जीवनासाठी प्राणवायुची गरज भासते व प्राणवायुसाठी वृक्ष लागवड करणे तेवढेच गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन व समतोल राखण्यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून प्रत्येक व्यक्तीने झाड लावणे आवश्यक आहे. कारखान्याने जून-२०२४ मध्ये कारखाना परिसरात विविध प्रकारच्या ३२,००० वृक्ष रोपांची लागवड केली असुन त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. चालू हंगाम जुन-२०२५ मध्ये कारखान्याच्या उपलब्ध क्षेत्रात आणखीन वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने २०२५ वृक्ष लागवडीसाठी निश्चित केलेल्या एक पेड माँ के नाम (एक झाड आईच्या नावाने) संकल्पनेनुसार कारखाना कर्मचारी वसाहत व परिसरामध्ये प्रत्येक कर्मचारी कामगार यांनी स्वत:चे आईच्या नावाने एक झाड लावुन त्याचे संरक्षण व संवर्धन करणेबाबतचा उपक्रम हाती घेतला असुन त्याप्रमाणे वृक्ष लागवड करण्यात येत आहे.
   निसगार्चे सौंदर्य व पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा याप्रमाणे प्रत्येक कर्मचाºयांनी आपल्या व्यक्तीगत जीवनात देखील सामाजीक बांधीलकी म्हणुन वृक्ष लागवड करावी व दुसºयांनादेखील वृक्ष लागवड करणेबाबत प्रोत्साहीत करावे, असे आवाहन यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी आवाहन केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!