ईदुल अजहा उत्साहात साजरी : धाराशिव शहरात शांततेत पार पडला बकरी ईद सण

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) :
धाराशिव शहरात ईदुल अजहा (बकरी ईद) आज धार्मिक उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी शहरातील ईदगाह मैदान, दर्गा मैदान, तसेच प्रमुख मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.

ईदगाह मैदानावर सकाळी ८.३० वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. या वेळी हाफेज उबेद शौकत यांनी नमाज पठण केले, तर मौलाना मुक्ती रहमतुल्ला यांनी खुदबा पठण करून ईदचे धार्मिक महत्त्व आणि बकरी ईदमागील उद्देश विषद केला.

ईदनिमित्त शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी DYSP स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक शकील शेख, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि ईदगाह कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदगाह कमिटीच्या वतीने उपस्थित प्रशासनाचे, पोलीस विभागाचे आणि सर्व नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, सण शांततेत पार पडल्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. ईदच्या निमित्ताने बकरीची कुर्बानी देण्यात आली आणि एकमेकांना शुभेच्छा देत स्नेहभावनेचे दर्शन घडवले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!