जगाच्या तत्त्वज्ञानामध्ये बुद्धाचा बुद्धिवाद पहिला

Spread the love

जगाच्या तत्त्वज्ञानामध्ये बुद्धाचा बुद्धिवाद पहिला

जगामध्ये सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून बौद्ध तत्त्वज्ञानाकडे पाहिले जाते. बुद्धांनी जन्माला घातलेला बुद्धिवाद जगाच्या तत्त्वज्ञानांमधला पहिला बुद्धिवाद आहे. त्यानंतर पाश्चात्य जगात १४ व्या शतकापासून प्रबोधनाला प्रारंभ झाला. पण बुद्धांचा बुद्धिवाद हा कोणत्याच धर्माच्या व कोणत्याच श्रद्धांच्या मर्यादामध्ये अडकत नाही.

आजचे तत्त्वज्ञानी, वैज्ञानिक आणि विचार करणारा प्रत्येक मनुष्य जगात सत्य, ब्रह्ममिथ्या असेच मानतो. बुद्धांची प्रमेये, सिद्धांत आजही जगाला विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रयोगामधून सिद्ध होत आहेत. विज्ञान आणि ईश्वर यांचा संबंध नाही. बुद्धांचे आणि विज्ञानाचे घरोब्याचे संबंध आहेत. मागील काही वर्षी पूर्वी जगातल्या शास्त्रज्ञांना सर्वात शेवटचा कण माष्णजे सुक्ष्म कण सापडला. त्याचे नाव ‘हिग्ज बोसॉन’, सर्वात सुक्ष्म कणाच्या शोधातील हा शोध आहे. हा शोध काय जगातल्या किंवा दैववादी तत्त्वज्ञानामुळे लागला नाही. तर तथागत गौतम बुद्ध यांच्या विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञाना मागील मतच आजच्या या शोधात काम करीत आहे.

पाश्चात्य जगात जसा बुद्धिवंतांचा आणि वैज्ञानिकांचा छळ झाला. तसाच भारतात वैदिक आणि देववाद्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचा केला. पण देश विदेशात असंख्य अनुयायी तथागत गौतम बुद्धांना मिळाले. कारण त्यांचे तत्त्वज्ञान हे सदसद्विवेक बुद्धी जागी करणारी, परिवर्तनाकडे, समतेकडे, विज्ञानाकडे, शांततेकडे घेऊन जाणारी होती.

तथागत गौतम बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्वच नाकारले आहे. कारण ती कल्पना मानवी जीवनाला घातक आहे. ती माणसाची विचार प्रक्रिया आणि मुक्ततेच्या मार्गावरचा सर्वात मोठा ‘स्पीड ब्रेकर’ आहे. वैज्ञानिक विचार थोतांड मानत नाही. म्हणून कोणत्याच काल्पनिक शक्तीवर विसंबून राहू नका. स्वयंपूर्ण व्हा, असे त्यांनी सांगितले.

धर्म हा अंधश्रद्धे शिवाय समाजाला कोणताच पाठ देत नाही. “ठेविले अनंते, तैसेची राहावे’ याप्रमाणे त्या अंधश्रद्धाचा प्रसार होत राहतो. धर्म आणि ईश्वर हे अंधश्रद्धेचे मायबापच आहेत. तथागताचा धम्म हा ईश्वर, परलोक, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, मोक्ष, वेद, अंधश्रद्धा नाकारतो. म्हणून नास्तिक आहे.तृष्णा हे मानवी मानसिकतेतील सर्व दुःखांचे करण आहेत. त्यामुळेच मानव अमानवीपणे वागतो.

बुद्धांची दुःखमीमांसा वास्तवावर अधिष्ठित आहे. दुःखाचे निर्माण आपण आहोत, त्यामुळे यापासून मुक्तीसुद्धा आपणालाच मिळवायची आहे. त्यासाठी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,सम्यक वाचा,सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती, सम्यक समाधी यामार्गाचा अवलंब करावा लागेल, बुद्धांची ही सम्यक तत्त्वं मानवी व्यवहाराशी निगडित आहेत.
तथागत गौतम बुद्ध यांनी चार तत्वांच्या द्वारे दुःख निवारणाचा मार्ग सांगितला आहे.दुःख सत्य आहे, दुःखाचे निराकरण होऊ शकते,दुःखाचे कारण आहे,
निराकरणासाठी अष्टांग मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

शितल वाघमारे
धाराशिव


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!