धाराशिव : विजापूर – सोलापूर – धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर या मार्गावर धावणारी एसटी महामंडळाची बस ऑनलाईन तिकीट प्रणालीमध्ये सकाळी ९:३० वाजता धाराशिवहून सुटते, असे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात ही बस तब्बल दीड तास उशिराने, म्हणजेच अकरा वाजता सुटत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दि. २८ एप्रिल रोजी एमएच २० बीएल ४०३६ क्रमांकाच्या गाडीचे तिकीट एका प्रवाशाने ९:३० वाज्याच्या वेळेनुसार आरक्षित केले होते. मात्र धाराशिव बस स्थानकावरील मुदत कक्षातील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, सदर बस प्रत्यक्षात अकरा वाजता सुटते. नंतर प्रवाशाने स्वतःही प्रत्यक्ष पाहणी करून याची खात्री केली.
या गोंधळामुळे प्रवाशांना साडेनऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत बस स्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. बस स्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने प्रवाशांसाठी लहानशा जागेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे, पंखे बंद आहेत आणि रात्रीच्यावेळी पोलीस सुरक्षा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.
महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट प्रणालीतील चुकीची माहिती प्रवाशांना गंडवत आहे. त्यामुळे धा परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या त्रुटी तातडीने दूर करून प्रवाशांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे
- अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण

- ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती

- वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..

- प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

- सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले





