धाराशिव (प्रतिनिधी) जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा येडशी येथील सहशिक्षिका श्रीमती कदम राजश्री भगवान आणि केंद्रीय मुख्याध्यापक, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,येडशी चे गाढवे राजाभाऊ श्रीपती यांचा सेवागौरव समारंभ सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
सत्कारमुर्तीचा शाळेच्या वतीने भेटाबांधून,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती गाढवे राजाभाऊ श्रीपती यांनी आपल्या दीर्घ सेवेचे अनुभव व सहकार्य केलेल्या शिक्षक व गावकरी, अधिकारी यांचे ऋण व्यक्त केले.श्रीमती कदम राजश्री भगवान, सहशिक्षिका, जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळा येडशी,यांनी आपल्या सेवेतील शिक्षक बंधु भगीनीचे सहकार्य, गावातील मंडळीचे सहकार्य यांच्या बद्ल ऋण व्यक्त केले. विजयकुमार प्रभाकर सस्ते, यांनी सत्कारमूर्तीच्या सेवेतील दीर्घ अनुभवाचा शाळेला झालेल्या फायदया बदल गौरव उदगार काढले.
प्रकाश पारवे, शिक्षण विस्तार अधिकारी येडशी,बीट,यांनी सत्कारमुर्तीला त्यांच्या सेवेतील कार्याबदल गौरव उदगार काढले व पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. म बशीर तांबोळी, धाराशिव यांनी सत्कारमुर्तीला सेवेतील घेतलेल्या परिश्रमाबदल गौरव उदगार काढले, येथून पुढे जास्तीत जास्त वेळ घरातील व्यक्तीसाठी द्यावा व खूप दूरच्या ठिकाणी फिरण्यासाठी जावे असा सल्ला दिला व पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच,डॉ. सौ.सोनिया प्रशांत पवार, यांनी सत्कारमुर्तींना शाळेच्या कार्यासाठी केलेल्या योगदानाबदल व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम सुंदर करण्यासाठी केंद्रीय प्राथमिक शाळा येडशी यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. यावेळी
सतीश शहाजी कुंभार, मुख्याध्यापक आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळा, शिंगाली, धाराशिव यांनी कदम आणि गाढवे यांचा प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.