परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसीय धाराशिव – सोलापूर दौरा जाहीर

Spread the love


धाराशिव :
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक येत्या ३० एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात विविध शासकीय कार्यक्रम, पायाभूत सुविधांचे उद्घाटन, स्थानिक नेत्यांशी बैठका आणि नागरिकांशी थेट संवाद यांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून भागातील विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

३० एप्रिल २०२५, बुधवार — पहिला दिवस:
प्रताप सरनाईक ठाण्यातून प्रस्थान करून धाराशिव विमानतळावर आगमन करतील. त्यानंतर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” या शासकीय कार्यक्रमात ते सहभागी होतील.
यानंतर धारूर गावात युवासेना शाखेचे उद्घाटन व स्थानिक सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.
त्यानंतर तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नूतनीकृत बस डेपोचे उद्घाटन करतील.
नंतर नळदुर्ग येथे किल्ल्याची पाहणी व युवासेना शाखेचे उद्घाटन करतील.
सायंकाळी सोलापूरकडे प्रयाण करून तेथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक व विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. रात्री धाराशिव येथे मुक्काम करतील.

१ मे २०२५, गुरुवार — दुसरा दिवस:
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडेल.
यानंतर स्थानिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होईल.
यानंतर पालकमंत्री कार्यालयात नागरिकांच्या भेटीचा कार्यक्रम आणि जिल्हा वार्षिक योजना व खरीप हंगामपूर्व आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
दुपारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभानंतर धाराशिव बस डेपोच्या नूतनीकरणाचे उद्घाटन होईल.
शेवटी, ते धाराशिव विमानतळावरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील व संध्याकाळी मुंबईत पोहोचतील. अशी माहिती मिळाली आहे.

*अर्धवट काम झालेल्या बस स्थानकाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक करणार उद्घाटन , उद्घाटनासाठी काम पूर्ण करण्याची गडबड, गुणवत्ता ढासळणार?


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!