वाघाचा कोरेगावमध्ये गायीवर हल्ला; धाराशिव जिल्ह्यात भीतीचं वातावरण

Spread the love

अंतरसंवाद न्यूज | धाराशिव | २७ एप्रिल २०२५
धाराशिव जिल्ह्यातील धुमाकूळ घातलेला वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे तब्बल दोन महिन्यांनंतर वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. वाघाने एका गायीवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन महिन्यांपासून वाघाचा ठावठिकाणा नव्हता

गेल्या दोन महिन्यांपासून वाघाचा कोणताही ठसा सापडलेला नव्हता. यामुळे वन विभागासह स्थानिक नागरिक संभ्रमात होते. या काळात पाळीव प्राण्यांवरही कोणतेही हल्ले झाले नव्हते.

जंगलातील शिकारीमुळे वाघ नजरेआड

प्राथमिक माहितीनुसार, वाघाने या कालावधीत जंगलात रानडुक्कर आणि हरण यांसारख्या वन्य प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह केला. त्यामुळे तो मानवी वस्तीपासून दूर राहून नजरेआड झाला होता.

वन विभाग सतर्क; विशेष पथक तयार

कोरेगावमध्ये गायीवर हल्ल्यानंतर वन विभाग सतर्क झाला आहे. पाळीव प्राण्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास वाघाला पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत केले जाणार आहे. जंगलात पिंजरे बसवणे, ट्रॅकिंग यंत्रणा सक्रिय करणे आणि ड्रोनच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन

वाघाच्या हालचालीमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना जंगलाजवळ एकटे फिरू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!