धाराशिव येथे लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात,  23 जोडपे विवाहबद्ध; अनेक मान्यवरांची उपस्थिती 

Spread the love

धाराशिव : प्रतिनिधी…

 एकीकडे वरपक्षाचा उत्साह आणि आनंद तर दुसरीकडे जा मुली तू दिल्या घरी सुखी राहा अशा भावनात्मक पाणावलेल्या डोळ्यांनी लोकमंगल फाउंडेशनचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवारी धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला झाला. दुपारी बारा वाजून 27 मिनिटांनी छायादीप मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्यात 23 जोडपी विवाहबद्ध झाली.

यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, संचालक मारुती तोडकर, ओमप्रकाश हिरेमठ, नाना लोमटे, रामराजे (मामा) पाटील, सुधीर सस्ते, व्यंकट गुंड,  रामदास कोळगे, तानाजी पाटील, गजानन वडणे, शिवाजी सरडे, विजय शिंगाडे, दत्तात्रय राजमाने, दादा बोडके, सचिन आडगळे, नितीन गरड,बाबा दरेकर,  सुरज

साळुंखे, अनिल जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.सुरुवातीला

सर्व वधू-वरांना स्त्री जन्माचे महत्त्व समजावून सांगतिले. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्रीभ्रूणहत्या करू नका, अशी शपथ सर्वाना देण्यात आली.या विवाह सोहळ्यात एकूण 23 जोडप्यामध्ये 2 बौद्ध, 1 मुस्लिम, 20 हिंदू जोडप्यांचा समावेश होता.

सोहळ्यात वधू-वरांना हळदी व लग्नाचे कपडे, मणिमंगळसूत्र, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू लोकमंगल फाउंडेशनमार्फत देण्यात आल्या. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. यामध्ये अनेकजणांनी सहभाग नोंदवला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!