धाराशिव :
विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी कोंड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य मोफत रक्त तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिरास वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा नेते विकास भैया बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकास बनसोडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून करण्या पेक्षा वाचून करावी व अशा प्रकारच्या सामाजिक कार्यक्रम घेऊन समाज हिताच्या कार्यक्रमांमधून बाबासाहेबांना अभिवादन करावे अशा प्रकारचे आव्हान केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महासचिव विकास गंगावणे साहेब तसेच सचिव अक्षय बनसोडे साहेब हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोंड गाव चे सरपंच सुनील शेटे डॉक्टर अंगद साळुंखे व सामाजिक कार्यकर्ते बंडू शिंदे इत्यादी प्रमुख पाहुणे कार्यक्रमास उपस्थित होते तसेच महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष सुरेखा ताई महावीर जाधव, मीना आजिनाथ जाधव, मनीषा रामपुरे, सुकुमार अंगद घाडगे, वर्षा राणी लोंढे, कांचन जयवंत भोसले, ज्योती रवींद्र जाधव, जयश्री क्षीरसागर व शितल बालाजी जाधव या महिलांनी देखील या शिबिरामध्ये उपस्थिती दर्शविली. तसेच या सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन वंचित बहुजन आघाडी कडून सन्मान सत्कार करण्यात आला. व समस्त महिलांच्या हस्ते कार्यक्रमातील प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरामध्ये नाव नोंदणी झालेल्या एकूण 62 व्यक्तींपैकी 40 व्यक्तींचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले उर्वरित व्यक्तींचे रक्त नमुने सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी घेऊन त्यांना देखील या शिबिराचा लाभ दिला जाणार आहे.
सर्व रक्त नमुने हे नोमान क्लिनिकल लॅबोरेटरी कोंड चे लॅब टेक्निशियन नबी मुलानी यांच्या मार्गदर्शनाने रक्त नमुने संकलित करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते नशीर शेख, महावीर जाधव, ज्ञानोबा कांबळे, अनिल सरवदे, हकीम बाबा शेख, संघर्ष जाधव, सूर्या भाई, अमन पवार, हनुमंत जाधव, रवी जाधव, बंकट जाधव, अजिनाथ जाधव, वैभव जाधव, अनिकेत जाधव व वंचित बहुजन आघाडी कोंड यांच्यातर्फे करण्यात आलेले होते.