

धाराशिव
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, संभाजीनगर परिक्षेत्र यांनी घेतलेल्या 2024-25 या आर्थिक वर्षातील धाराशिव पोलीस दलाची तपासणी दि.25.03.2023 ते 28.03.2023 या कालावधीत घेण्यात आली.सदर वार्षीक तपासणी दरम्यान दि. 25.03.2025 रोजी मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब व पोलीस ठाणे कळंब येथे भेट देवून पोलीस ठाण्यात स्वच्छते बाबत तसेच कामकाजाचे अनुषंगाने मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा, कॅश मोहरर, क्राईम मोहरर, यांच्या कामकाजाची व अभिलेख, मुद्देमाल मांडणी, गुन्हे निर्गती, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण व अर्ज निर्गती, गुन्हे प्रतिबंध व अभिलेख अदयावत करणे याबाबत आढावा घेतला. पोलीस ठाणे कळंब येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर नागरिकांना पिण्याचे पाणी व आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा सामोपचाराने निपटारा देखील वेळेवर केला जात आहे. जनतेला सेवा देण्याबरोबरच प्रशासकीय कामकाजामध्ये देखील पारदर्शकता आणून कळंब पोलीस ठाणे कॉम्प्युटराईज्ड कामकाज करण्यामध्ये अग्रेसर झाले आहे. याबाबत समाधान व्यक्त केले.
दि.26.03.2025 रोजी सकाळी 11.00 वा. सु. मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाणे उमरगा येथे भेट दिली. भेटी दरम्यान पो.स्टे. उमरगा येथील परीसराची व इमारतीची स्वच्छता, तसेच पोलीस स्टेशन परिसरातील सौंदर्यकरण या अंतर्गत उमरगा पोलीस ठाणे यांनी दगडावर केलेले कातळ चित्रे, चाटु वरील पेटींग, लाकडी ठेाकळ्यांची केलेली बैठक व्यवस्था व सेल्फी पॉईट असे बदल करण्यात आले होते. त्याबाबत त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच नागरिकासाठी अभ्यागत कक्ष,पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाणे उमरगा येथील मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा, कॅश मोहरर, क्राईम मोहरर, यांच्या कामकाजाची व अभिलेख, मुद्देमाल मांडणी, गुन्हे निर्गती, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अर्ज निर्गती या बाबत आढावा घेवून सर्व कामकाजाचा आढावा घेवून समाधान व्यक्त केले.
दि.27.03.2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय व 18 पोलीस स्टेशन येथे ई मुद्देमाल कक्षाची उभारणी करण्यात आली असुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे ई मुद्देमाल कक्षाचे उदघाटन व्ही.सी. द्वारे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. त्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंर्तगत असलेल्या मुद्देमाल कक्षाची पाहणी करुन मुद्देमाल मांडणी बाबत समाधान व्यक्त केले.
धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वृक्षरोपन केले. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले असुन या दोन्हीचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, धाराशिव शहर पोलीस ठाण्यास आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले असून पोलीस निरीक्षक शकील शेख यांचा प्रमाणपत्र देऊन श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मा. वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, यांनी मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवसीय कृती आराखडाच्या अनुषंगाने अंमलबजाणी संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे दि.27.03.2025 रोजी सायबर गुन्ह्याचा तपास आधुनिक पध्दतीने करण्या करीता मा. पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे आधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज सायबर लॅबची उभारणी करण्यात आली आहे. सदर सायबर लॅबचे उदघाटन श्री. वीरेंद्र मिश्र, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा विशेष शाखा येथे भेट देवून त्याठिकाणी काढण्यात आलेला नवरात्र महोत्सवा निमीत्त पोलीस बंदोबस्ताचा आराखडा व व्हि आय पी कॅन्व्हाय याबाबत रांगोळी काढून आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता. त्याबाबत त्यांनी विशेष प्रशांसा केली. पोलीस मुख्यालयात संकल्प बहुउद्देशीय सभागृहाची उभारणी करण्यात आली असुन त्याचे उदघाटन श्री. वीरेंद्र मिश्र, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते करण्यात आले.तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा,जिल्हा विशेष शाखा, सायबर पोलीस ठाणे,आर्थिक गुन्हे शाखा, भरोसा सेल, दहशतवादी विरोधी पथक याबाबत पीपीटीच्या माध्यमातुन आढावा घेवून कामकाजा बाबत सुचना दिल्या.
दिनांक 28/03/2025 रोजी सकाळी 07.00 वाजेला पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, येथे धाराशिव, श्री. संजय जाधव, पोलीस अधीक्षक यांनी परेड कमांडर म्हणुन तर सेंकड इन परेड कमांडर म्हणुन श्रीमती. शफकत आमना, यांनी सेरेमोनियल परेडचे नेतृत्व करून मा.वीरेन्द्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मानवंदना दिली. सदर सिरमोनियल परेड बाबत मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छ.संभाजीनगर परिक्षेत्र यांनी परेडचे बारकाईने निरीक्षण करुन ड्रेसिंग कावरिंग वल्ड ऑफ कमाण्ड असे एकंदरित परेड चांगली झाल्या बद्दल प्रसंशा केली.
या निरीक्षण दरम्यान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीसांचे शस्त्र, लाठी, स्कॉड ड्रिल, गार्ड ड्रिल, हातकडी बागदोर, इत्यादी कवायतीचे प्राविण्य तपासण्यात येवुन स्वंयचलित शस्त्र हाताळण्याचे कौशल्याची पाहणी करून मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट प्रात्यक्षित सादर केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रिवार्ड दिले. तसेच दंगल परिस्थीती हाताळण्यासंबधीचे व बेकाबु जमावावर नियंत्रण मिळविण्याचे दृष्टीने दंगा नियंत्रणाचे प्रात्याक्षिकाचे प्रदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले.
पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सभागृहात आज दि. 28.03.2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले.सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये त्यांनी 1) अवैध व्यवसायांवर अधिक कारवाई- दारूबंदी, जुगार, आर्मस ॲक्ट, एन.डी.पी.एस. वाळु चोरी, पिटा 2) प्रलंबित गुन्हयांचे प्रमाण 3) प्रतिबंधात्मक कारवाई 4)पाहिजे फरार व फरारी आरोपी 5) कन्व्हीक्शन प्रमाण 6) समन्स व वॉरंट 7) गुन्हे उघड करण्याचे प्रमाण 8) मालमत्ता विषय गुन्हे 9) किंमती मुद्देमाल निर्गती 10) मोटार वाहन कायदा कारवाई 11) वरिष्ठ अर्ज निर्गती 12) नाविण्यपुर्ण उपक्रम याबाबत अभिलेखाची पडताळणी करून सुचना दिल्या तसेच सर्व प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले कि, ठाण्यात तक्रारदारआल्यानंतर त्यांचेशी सौजन्यपुर्ण वागणूक देवुन तक्रारीचे अनुषंगाने तात्काळ कायदेशिर कारवाई करावी. तसेच मालाविरूध्दच्या गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमालाचे सचोटीने तपास करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन तो फिर्यादी यांना तात्काळ भेटेल यासाठी जलद कारवाई करावी. तसेच मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाचे 07 कलमी योजनांची कटाक्षाने अंमलबजावणी करावी असे सूचना देवुन त्यांनी जिल्हयातील पोलीस ठाणे कळंब, तसेच उपविभाग कळंब, पोलीस ठाणे उमरगा, उपविभाग उमरगा यांना भेटी देवुन तेथील संपुर्ण कामाजाचा आढावा घेवुन अभिलेखाची पडताळणी केली आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे,सी.सी.टी.एन.एस प्रणाली मध्ये उत्कष्ट कामगिरी, पोलीस ठाणे अंतर्गत मुद्देमाल कक्षात मुद्देमालाच व्यवस्थित मांडणी, एन.डी.पी.एस कायद्याखाली कारवाई, डायल 112 मध्ये नागरिकासाठी वेळेवर सुविधा उपलब्ध् करुन देणे,अपहरणाचे गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट केल्या बद्दल धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत असलेले श्रीमती अश्विनी शामराव भोसले, पोनि, पोलीस ठाणे उमरगा, श्री. श्रीकांत भराटे, सपोनि, श्री. जी. पी. पुजरवाड, श्री. आर. एस. चाटे, पोउपनि पो.ठाणे उमरगा, सचिन बेंद्रे, सपोनि, वाहतुक शाखा, धाराशिव, श्री. सुदर्शन कासार, सचिन विश्वनाथ खटके,अमोल सुभाष मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थागुशा, धाराशिव, श्री. परमेश्वर उत्तरेश्वरआप्पा गंभीरे, प्रमुख लिपीक, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव, श्री. सपोनि प्रविण सोमवंशी, दहशतवाद विरोधी शाखा, धाराशिव, श्रीमती. प्रज्ञा जाधव, महिला पोलीस नाईक – 1562, पोलीस ठाणे ढोकी, श्रीमती. सीमा बडे, महिला पोलीस हवालदार- 505, पोलीस ठाणे आनंदगनर, पल्लवी सतीश काटे, महिला पोलीस अंमलदार-858 पोलीस ठाणे, 1) पोलीस हवालदार-1870 कांबळे, 2) पोलीस अंमलदार- 1701 उंबरे, पोलीस अंमलदार- 773 सोनटक्के, पोलीस अंमलदार- 520 समुद्रे, पोलीस नाईक- 1613 सय्यद 4) पोलीस अंमलदार- 373 सोनटक्के 5) पोलीस अंमलदार- 1626 दिवे नेमणुक पोस्टे, उमरगा, पोलीस ठाणे आनंदनगर येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार-858 पल्लवी सतीश काटे, रईसा शेख लाल नदाफ, पोलीस हवालदार- 897, रईसा छन्नु मुलाणी, महिला पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, धाराशिव आय. टी. सेल शाखा सपोफौ अमोल गणेश, यांचा समावेश आहे. यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आज दि. 28 मार्च 2026 रोजी श्री.वीरेंद्र मिश्र,मा.विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते प्रंशसापत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. एंकदरीत धाराशिव जिल्ह्यातील पोलीससांचे कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले. पुढील कामकाज करण्यासाठी प्रोसाहीत करुन शुभेच्छा दिल्या. सदर वेळी पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. सफकत आमना सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे व शाखा अधिकारी उपस्थित होते.