
तुळजापूर : श्रीतुळजाभवानी मंदिरात एका अज्ञात भक्ताने गुप्त दान करत तब्बल 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण केली आहेत. विशेष म्हणजे, या भक्ताने आपल्या दानाबाबत कोणालाही कळू दिले नाही, खऱ्या अर्थाने एका हाताने दान करत दुसऱ्या हातालाही त्याची चाहूल लागू दिली नाही.
दानपेटीतील सोन्याचा साठा उघडकीस
मंदिरातील नियमित दानपेटी मोजणीसाठी शुक्रवार, 28 मार्च 2025 रोजी पेट्या उघडल्या असता देवींच्या मूळ गाभाऱ्यासमोरील चोपदार दरवाज्यातील सिंहासन पेटी क्र. 2 मध्ये या सोन्याच्या 11 बिस्किटांचा साठा आढळून आला. प्रत्येकी 100 ग्रॅम वजन असलेल्या या बिस्किटांचे एकूण वजन 1100 ग्रॅम असून, बाजारभावानुसार त्यांची किंमत जवळपास 1 कोटी रुपये आहे.
मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी केली जाते. त्यामुळे हे दान बुधवार किंवा गुरुवारी केले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या बिस्किटांवर वजन (100 ग्रॅम) आणि शुद्धता (999.0) अशी स्पष्ट नोंद आहे.
दानपेटी मोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता
श्रीतुळजाभवानी संस्थान येथे दानपेटीतील रकमेची व साहित्याची मोजणी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकृत व्यक्तीच्या उपस्थितीतच आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली (Under CCTV Surveillance) तसेच नियमित व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने केली जाते. त्यामुळे प्रत्येक दानाचे योग्य हिशोब ठेवला जातो आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते.
भाविकांचे दान, सुरक्षा कर्मचारी सतर्क
मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात भाविकांना सुरक्षित वातावरण मिळावे तसेच त्यांचे दान योग्य ठिकाणी पोहोचावे